झेंड्यावरून दोन गटांत हाणामारी
By Admin | Published: March 24, 2017 11:54 PM2017-03-24T23:54:01+5:302017-03-24T23:57:02+5:30
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे कमानीवरील झेंड्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे कमानीवरील झेंड्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना २३ मार्च रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून ३९ जणांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इटकळ येथील कमानीवर लावलेला झेंडा काढण्यावरून व तेथे दुसरा झेंडा बसविण्याच्या कारणावरून २३ मार्च रोजी सायंकाळी दोन गटांत बाचाबाची झाली़ या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने गावात एकच तणाव निर्माण झाला होता़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़ या प्रकरणात एका गटातील प्रताप शहाजीराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिराज नजीर मुजावर, अल्ताफ मुजावर, अजीज मुजावर, सहदाम शेख, ईस्माईल मुजावर, सादिक शेख, जाऊत शेख, सादिक शेख, शहनवाज मकानदार, अस्लम भावर व इतर १० ते १५ अशा २५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर दुसऱ्या गटातील सिराज नसीर मुजावर यांच्या फिर्यादीवरून प्रताप शिंदे, योगीराज कापसे, विजय सावंत, भारत पांढरे, अतुल बंडगर, अमोल बंडगर, दादा भोसले, ज्ञानेश्वर माशाळकर, खंडू पांडरकर, अण्णा पाटील, खंडू येडगे, कोंडीबा येडगे, लक्ष्मण भोसले, बाबूराव टेळे आदींविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोफौ सय्यद हे करीत आहेत़ (वार्ताहर)