औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:09 PM2018-01-19T16:09:59+5:302018-01-19T16:09:59+5:30

एमजीएमच्या क्लोवर डेल शाळेत दहावीमध्ये शिकणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उस्मानपुरा भागातील विवेकानंदपुरम येथे गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

A Class 10 student resident of Aurangabad has committed suicide | औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या 

औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या 

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएमच्या क्लोवर डेल शाळेत दहावीमध्ये शिकणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उस्मानपुरा भागातील विवेकानंदपुरम येथे गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रज्वल विजय देसाई असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रज्वल हा क्लोवरडेल शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो शाळेतून घरी आला. यावेळी  शिक्षिका असलेली त्याची आई शाळेवर होती. त्याचे वडिल २००८ मध्ये घाणा देशात मृत्यू पावलेले आहेत. प्रज्वल घरी आला तेव्हा ७० वर्षीय वृद्ध आजी घरी होती. यानंतर तो अभ्यास करतो, असे आजीला सांगून वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेला. 

चार वाजेच्या सुमारास त्याची आई शाळेतून घरी आली तेव्हा प्रज्वल कोठे आहे, असे त्यांनी आजीला विचारले. तेव्हा तो वरच्या खोली अभ्यासाला गेल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्याची आई त्याला शोधत वरच्या मजल्यावर गेली तेव्हा प्रज्वलच्या खोलीचे दार आतून बंद होती. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता प्रज्वलने छताच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी आईने हंबरडा फोडल्याने आजी आणि शेजारी तेथे धावले .  या घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी प्रज्वलला खाली उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 

याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शाळेत सध्या दहावी बोर्ड परीक्षेचे सराव पेपर सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेचे गुण सांगितल्या जात आहे. परीक्षेच्या  टेन्शनमुळे त्यांने आत्महत्या केली असावी,असा संशय पोलिसांना आहे. पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे तपास करीत आहे.

 

Web Title: A Class 10 student resident of Aurangabad has committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.