दुसºया दिवशीही क्लासेसची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:51 AM2017-09-27T00:51:33+5:302017-09-27T00:51:33+5:30
शहरातील पाच कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाने छापे मारले होते़ त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळपासून या क्लासेसच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरु केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील पाच कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाने छापे मारले होते़ त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळपासून या क्लासेसच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरु केली़
शहरातील बाबानगर भागात एकाच इमारतीत असलेल्या चार आणि शेजारील एक अशा पाच कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी छापा मारला होता़ नोटबंदीच्या काळात करण्यात आलेले व्यवहार तसेच कमी विद्यार्थीसंख्या दाखवून आयकर चुकविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता़ सोमवारी दिवसभरानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आयकर भवन या ठिकाणी या पाचही क्लासेसचालकांची कागदपत्रे आणि व्यवहाराची तपासणी करण्यात आली़ त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजेपासून पुन्हा त्यांना आयकर भवन येथे पाचारण करण्यात आले होते़ तीन जिल्ह्यांतील ३० अधिकाºयांच्या पथकाकडून ही तपासणी सुरु आहे़ तपासात नेमके काय पुढे आले, हे मात्र अद्याप कळाले नाही़