स्वच्छतेत जालना शहर मागेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 12:14 AM2017-05-05T00:14:45+5:302017-05-05T00:15:39+5:30
जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला.
जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला. थोडक्यात जालना लांब फेकले गेल्याने शहरातील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केंद्राच्या नगर विकास विभागाने जानेवारीमध्ये स्वच्छ शहर स्पर्धा घेतली होती. यात अंतर्गत शहरातील शौैचालयासह एकूणच स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नगर पालिका स्वच्छतेच्या कामांत किती अग्रेसर आहे. कचरा निर्मूलन तसेच दैैनंदिन स्वच्छता कशी होते याबाबत विशेष पथक तसेच पालिकेने पाठविलेल्या माहितीच्या आधारावर केंद्राने शहर स्वच्छतेचा निकष ठरविला आहे. केंद्रीय पथकाने जानेवारीत संपूर्ण शहरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली होती. याचे छायाचित्रणही केले होते. सोबतच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना थेट उकिरडे अथवा हगणदारी ठिकाणचे छायाचित्र आॅनलाईन पाठविण्यास सांगितले होते. विविध पातळ्यांवर अभ्यास करून शहराला ३६८ वा क्रमांक दिला.
जालना शहरात दररोज ओला व सुका मिळून सुमारे ८० टन कचरा जमा होतो. पालिकेकडे मनुष्य बळ कमी असल्याने सुमारे ६० ते ६५ टन कचरा दररोज उचलला जातो. पालिकेच्या स्वच्छता विभागात ३५७ कर्मचारी आहेत. संपूर्ण शहर योग्यरित्या स्वच्छ करण्यासाठी सातशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले, केंद्राच्या नगर विभाग विभागाने ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत जालना शहरास नेमके गुण किती मिळाले याची माहिती नाही. मात्र, ३६८ वा क्रमांक मिळाला आहे. यामुळे जालना शहरातील स्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. आगामी काळात
विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्राने जे निकष सांगितले होते त्यानुसार अनेक
निकष पालिकेने पूर्ण केले
असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)