स्वच्छ प्रतिमा, साधेपणा बीडकरांना भावला
By Admin | Published: February 17, 2015 12:03 AM2015-02-17T00:03:31+5:302015-02-17T00:39:49+5:30
बीड : साधी राहणी, स्वच्छत प्रतिमा, परखड वक्ता, दूरदृष्टीचे विचार यामुळे आर. आर. यांनी बीडकरांवर कायम गारुड निर्माण केले. निवडणुका कुठल्याही असोत आर. आर.
बीड : साधी राहणी, स्वच्छत प्रतिमा, परखड वक्ता, दूरदृष्टीचे विचार यामुळे आर. आर. यांनी बीडकरांवर कायम गारुड निर्माण केले. निवडणुका कुठल्याही असोत आर. आर. स्टार प्रचारक म्हणून जिल्हा पिंजून काढायचे. त्यांची सभा म्हटले की, तोबा गर्दी व्हायची. सर्वसामान्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्या भावनांचा ते ठाव घेत. कार्यकर्त्यांशीही त्यांनी नाळ जोडली होती. त्यामुळे ते बीडकरांना नेहमी आपलेच वाटले. त्यांच्या निधनाने सोमवारी जिल्हा शोकमग्न झाला. आर. आर. यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली... (प्रतिनिधी)
तंटामुक्ती, ग्रामस्वच्छता अशा प्रभावी योजना त्यांनी राबविल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले आहे.
- अमरसिंह पंडित, आमदार
उपेक्षितांना न्याय देण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले होते. विविध पदे भूषवूनही ते साधेपणाने सामान्यांमध्ये मिसळत होते.
- संदीप क्षीरसागर, सभापती, जि.प.
विकासाची दृष्टी असलेल्या आर.आर. यांनी अनेक योजना राबविल्या. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही.
- प्रीतम मुंडे, खासदार
पक्षाला संजीवनी देण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले होते. त्यांची कल्पकता देशालाही स्वीकारावी लागली.
- प्रकाश सोळंके, माजी राज्यमंत्री
राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी वेगळी उंची गाठली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे.
- अशोक डक, जिल्हाध्यक्ष, राकाँ
गृहमंत्रीपद गाजवले ते आर. आर. पाटील यांनीच. सराफांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नि:स्वार्थीपणे सतत आग्रही असायचे.
- मंगेश लोळगे, व्यापारी