हतनूर येथील कृषी विभागाच्या इमारतीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:04 AM2021-01-02T04:04:47+5:302021-01-02T04:04:47+5:30
कृषी विभागाकडून हतनूर गावात इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र, येथे सतरा वर्षांपासून एकाच कृषी सहायकाचे नाव दरवाजावर लावून इमारत ...
कृषी विभागाकडून हतनूर गावात इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र, येथे सतरा वर्षांपासून एकाच कृषी सहायकाचे नाव दरवाजावर लावून इमारत कुलूपबंद करण्यात आलेली होती. इमारत बंद असल्याने आजूबाजूला कचरा साचला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला, तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मात्र, कृषी विभाग जागा झाला. शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी स्वतः हतनूर येथे येऊन कृषी विभागाच्या कार्यालयाचा बंद असलेला श्वास मोकळा करून दिला. यावेळी कृषी सहायक अमोल वाळुंजे, संदीप शिरसाठ आदींसह गावकरी उपस्थित होते.
फोटो : कृषी विभागाची हतनूर येथील इमारत.