निवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन मंजुरीसाठी लिपिकाने घेतली लाच; कृषी विभागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:32 PM2023-03-02T19:32:17+5:302023-03-02T19:34:09+5:30
४५०० रुपयांची लाच घेताना सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक अटकेत
सिल्लोड: तक्रारदार यांच्या वडिलांचे पेन्शन मंजूर करून आणण्यासाठी सेवा पुस्तक ऑनलाईन करून नागपूरला पाठविण्यास पंचासंमक्ष लाचेची मागणी करून लाचेची रक्कम ४५०० रुपये स्वीकारताना सिल्लोड कृषी विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले ही कार्यवाही गुरुवारी दुपारी करण्यात आली. रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव काकाराव बाजीराव जिवरग ,वय ५२ वर्ष कनिष्ठ लिपिक, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड असे आहे.
ही कारवाई विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,मारुती पंडित पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ अधिकारी दिपाली निकम पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग,व पोहेकॉ,रवींद्र काळे, पोना, सुनील पाटील , शिरीष वाघ, चांगदेव बागुल यांनी केली.
ही तक्रार ३५ वर्षीय तरुणाने केली असून वडिलांचे पेन्शन मंजूर करण्यासाठी सदर कनिष्ट लिपिकाने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर युवकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.गुरुवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून रचून सदर कनिष्ठ लिपिकास ४५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.