अॅकॅडमीच्या नावावर कुंटणखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:21 AM2017-09-28T00:21:15+5:302017-09-28T00:21:15+5:30
शहरातील तरोडा भागात गोदावरीनगर या मुख्य वस्तीत अॅकॅडमीच्या नावाचा फलक लावून फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी धाड मारली होती़ या प्रकरणात सहा महिला आणि दोन पुरुषांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील तरोडा भागात गोदावरीनगर या मुख्य वस्तीत अॅकॅडमीच्या नावाचा फलक लावून फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी धाड मारली होती़ या प्रकरणात सहा महिला आणि दोन पुरुषांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
भाग्यनगर पोलिसांना गोदावरीनगर येथील एका फ्लॅटमध्ये अवैध कुंटणखाना सुरु असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली होती़ त्यानंतर उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार, संगीता कदम, सविता खुर्जुले, गायकवाड, नागरगोजे, भिसे हे गोदावरी नगरमध्ये गेले़ तत्पूर्वी एका पंटरला बनावट ग्राहक बनवून आतमध्ये पाठविण्यात आले होते़ अपेक्स अॅकॅडमी असा बोर्ड फ्लॅटच्या बाहेर लावला असल्यामुळे कुणालाही एवढे दिवस त्याबाबत संशय आला नव्हता़ आतमध्ये गेलेल्या पंटरने इशारा करताच पोलीस आत गेले़ या ठिकाणी हॉलमध्ये बसलेल्या एका आंटीसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले़ फ्लॅटमधील इतर खोल्यांची तपासणी केली असता, आणखी दोन महिला आणि पुरुषांना पकडण्यात आले़
या महिलांची उपअधीक्षक अभिजित फस्के यांची चौकशी केली़ त्यावेळी एजंटाच्या माध्यमातून हा सर्व व्यवसाय चालत होता. यावेळी महिला आणि पुरुषांकडून पोलिसांनी मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली़
या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़