अवैध वाहतुकीचा जवळ्यात सुळसुळाट

By Admin | Published: May 19, 2014 11:50 PM2014-05-19T23:50:44+5:302014-05-20T00:05:51+5:30

जवळा बाजार : परभणी ते हिंगोली राज्य मार्गावर जवळा बाजार हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात.

Close the traffic of the illegal traffic | अवैध वाहतुकीचा जवळ्यात सुळसुळाट

अवैध वाहतुकीचा जवळ्यात सुळसुळाट

googlenewsNext

जवळा बाजार : परभणी ते हिंगोली राज्य मार्गावर जवळा बाजार हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे नेहमीच येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. जवळा बाजार येथे मोठी बाजारपेठ असून परभणी ते हिंगोली रस्त्यालगत काही दुकानासमोर वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. बस थांबावर अवैध प्रवास करणार्‍या जीप, आॅटो, मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर जवळाबाजार येथील मुख्य रस्त्यावर तसेच बसस्थानकापासून हिंगोलीकडे व परभणीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आडवी लावली जातात. त्यामुळे परभणी-हिंगोली या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनांना या रस्त्यावर अर्धा-अर्धा तास थांबावे लागत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जवळाबाजार येथे बसस्थांब्याजवळ पोलिस मदत केंद्र आहे; परंतु या ठिकाणी एकही कर्मचारी शिस्त पाळत नाहीत. हट्टा पोलिस स्टेशनचे अशोक चाटे हे जवळाबाजार येथे कधीतरी येतात. त्यामुळे तेथील पोलिसांवर त्यांची वचक राहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या दुर्लंक्षामुळे बसस्थानक हे अवैध वाहतुकीच्या कचाट्यात सापडले आहे. तरी या ठिकाणी कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Close the traffic of the illegal traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.