८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:01 AM2019-05-21T00:01:44+5:302019-05-21T00:02:28+5:30

कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.

Close the work of more than 800 revenue workers | ८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन विरोधात संघटना : मतमोजणीतील कर्मचारी कार्यरत राहणार

औरंगाबाद : कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.
गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील. दुष्काळी उपाययोजना वगळता कोणत्याच कामांत महसूल कर्मचाºयांचा सहभाग राहणार नाही. शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच मतमोजणीच्या कामावर या कामबंद आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही. इलेक्शन ड्यूटीवर सर्व कर्मचारी कार्यरत राहतील, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
सोमवारी २० मे रोजी सकाळी सर्व संघटनांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यासोबत संघटनांची चर्चा झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्यासोबत संघटनेने चर्चा केली. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संघटनेने कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. सकारात्मक तोडगा निघाला नाहीतर विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करणार
मंडळ अधिकारी, वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला म्हणजे ते आरोपी होत नाहीत. कन्नड उपविभागीय कार्यालयातील प्रकरणात नेमके काय घडले आहे, याची अप्पर जिल्हाधिकाºयांकडून चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १७ मे रोजी स्पष्ट केले होते. परंतु किती कालावधीत चौकशी पूर्ण होणार हे स्पष्ट केले नाही. जिल्हाधिकाºयांनी संघटनेशी तोंडी चर्चा केली आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन आणि मंडळ अधिकारी, वाहनचालकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी सांगितले.
कामबंद आंदोलनाचा परिणाम
कामबंद आंदोलनाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. दुष्काळाचे कामकाज वगळता उर्वरित विभाग कर्मचाºयांविना ओस पडले होते. प्रशासनाने मात्र, सर्व कामकाज सुरळीत असल्याचा दावा केला. तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून, वाहनचालकांसह महसूल कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांचा कामबंद आंदोलनात समावेश आहे. चिकलठाणा तलाठी विशाल मगरे, मंडळ अधिकारी अप्पासाहेब गोरडे यांनी सांगितले, दुष्काळ नियोजन वगळता इतर महसुली विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.
नेमके प्रकरण काय आहे
बापू रिंढे याने गुरुवारी कन्नड उपविभागीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्येस मंडळ अधिकारी बी. एन. गवळी, वाहनचालक सुनील चिंधुटे जबाबदार असल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. रिंढे यांच्या गळफासाला महसूल कर्मचारी जबाबदार नाहीत. त्याच्या नातेवाईकाच्या तोंडी मागणीवरून हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस निरीक्षकांना प्रकरण हाताळता आले नाही, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
------------

Web Title: Close the work of more than 800 revenue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.