औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:09 AM2018-08-10T01:09:57+5:302018-08-10T01:10:40+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यव्यापी बंदची हाक दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी शहर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटी देऊन बंदमध्ये सहभाग घेतला.

Closing all schools and colleges in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ८०० शाळांना सुटी : सरकारी कार्यालये मात्र सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यव्यापी बंदची हाक दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी शहर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटी देऊन बंदमध्ये सहभाग घेतला.
काल सायंकाळनंतर क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत विद्यार्थी सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाºयांना शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्रीतूनच संबंधित अधिकाºयांनी शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापकांना यासंबंधीचे आदेश पोहोचते केले.
काही शाळांनी पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून गुरुवारी शाळा बंद असल्याचे कळविले, तर अनेक पालकांनी सुटीबाबत फोन करून खातरजमा करून घेतली. संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरात सकाळपासूनच शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आवाहन करीत तरुणांचे टोळके शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जात होते; परंतु तेथे प्रवेशद्वारातच ‘आज शाळा,महाविद्यालय बंद आहे’ अशी सूचना लिहिलेले फलक दिसून आले. बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूलबस, रिक्षा रस्त्यांवर फिरकल्या नव्हत्या.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले की, जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जि.प. शाळांसह सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सुटी देण्यात आली होती.
जादा तासिका घेऊन आज सुटीमुळे बुडालेल्या तासिकांची भरपाई करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Closing all schools and colleges in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.