जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 10:51 PM2016-02-17T22:51:06+5:302016-02-17T22:59:36+5:30

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

The closing ceremony of the district library concludes | जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

googlenewsNext

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमाणपत्र वितरण, व्याख्यान, तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले.
अशोक अर्धापूरकर, प्रमुख वक्ते उत्तम सूर्यवंशी, प्रमोद पाटील, खंडेराव सरनाईक, विजय हवालदार, प्रा. जी. पी. मुपकलवार, सुभाष साबळे, जया करडेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रथम उत्तम सूर्यवंशी यांनी वाचन संस्कृतीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले, ग्रंथाशिवाय मन तयार होत नाही; त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, माणसाच्या जीवनामध्ये विचार करणे हेच जिवंतपणाचे लक्षण असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.रा. शिंदे व यशवंतराव चव्हाण आदींची उदाहरणे देत स्पष्ट करून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले. यावेळी अंजली जावळे हिने मुलींनी जगावे तरी कसे? ही कविता सादर केली. तर कोमल बांगर हिने आई आपल्या मुलाला गरिबीमध्ये जगणे कशाप्रकारे शिकवते याविषयी काव्यकथन केले. तसेच प्रदीप बनसोडे, अदित्य जाधव, मोहन पांचाळ, आदित्य राखुंडे, प्रदीप बनसोडे यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांनी विविध काव्यवाचन व कथाकथन करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्धापूरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ग्रंथाशिवाय माणूस घडणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ आणि ग्रंथालय कपाट असणे आवश्यक आहे. सयाजीराव गायकवाड यांनी गाव तेथे गं्रथालये ही संकल्पना मांडली होती. परंतु सध्या असे चित्र दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा.विलास वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रंथालय संघातर्फे यासाठी परिश्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The closing ceremony of the district library concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.