आर्थिक लूट करणारे तीन आधार केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:33 AM2017-09-12T00:33:20+5:302017-09-12T00:33:20+5:30
आधार कार्डसाठी १०० ते २०० रूपये घेऊन सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाºया तीन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आधार कार्डसाठी १०० ते २०० रूपये घेऊन सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाºया तीन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. ही कारवाई मागील दोन दिवसात करण्यात आली. ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टींग’मधून ही बाब चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि कारवायाचा धडाका सुरू केला.
‘आधार साठी सर्वसामान्यांची आर्थिक लूट’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. शहरातील विविध आधार केंद्रांना भेटी देऊन कशाप्रकारे सर्वसामान्यांकडून पैसे घेतले जातात, ही बाब समोर आणली होती. याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले आणि आधार केंद्रांची पाहणी करण्यास सुरूवात केली.
सुरूवातील बीड शहरातील तहसील कार्यालयासमोरील आधार केंद्र त्यानंतर नेकनूर व गेवराईत आधार केंद्रांची पाहणी करून त्यांचे केंद्र बंद करण्यात आले. याबाबत तलाठ्यांच्या उपस्थितीती पंचनामा करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.
सर्वसामान्यांमध्ये समाधान
लोकमतने स्टींगच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करून ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर लुट करणाºया आधार केंद्रावाल्यांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी कारवाईच्या भितीने केंद्र बंद केले. तर तीन केंद्र प्रशासनाने बंद केले. लुट थांबल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.