ढगाळ वातावरणामुळे केळगाव परिसरातील बहरलेला कांदा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:22+5:302021-02-24T04:05:22+5:30
मागील वर्षी कांदा व्यापार्यांकडून ३५०० ते ४००० हजार रुपये क्विंटल या भावाने शेतकर्यांनी कांद्याची लागवड केली. बी काढणीस आल्याने ...
मागील वर्षी कांदा व्यापार्यांकडून ३५०० ते ४००० हजार रुपये क्विंटल या भावाने शेतकर्यांनी कांद्याची लागवड केली. बी काढणीस आल्याने सुरुवातीलाच भाव ३५००० हजार प्रति क्विंटल होते. नंतर कांद्याचे बियाचे भाव एक लाखापर्यंत गेले होते. मात्र शेतकर्याने सुरुवातीलाच कांद्यांचे बियाणे व्यापार्यांना विकल्याने नुकसान करावे लागले. त्यामुळे यंदा कांद्याला चांगला भाव मिळाला पाहीजे. या आशेने शेतकर्यांनी जोमाने कांद्याची लागवड केलेली आहे. परंतु गेल्या आठव़डयापासून ढगाळ वातावरणामध्ये कांद्याचे बी हाती लागणार का, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत दिसत आहे. ढगाळ वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारा बरसल्यास रब्बीचे हातचे कांदा पीक जाणार या चिंतेने बळीराजा चिंतेत सापडला आहे.