मिटमिटावासी दहशतीखाली, अघोषित बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:13 AM2018-03-09T00:13:07+5:302018-03-09T00:13:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचरा टाकण्याच्या वादावरून बुधवारी उसळलेली दंगल, दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीमारामुळे पसरलेली भीती व दहशतीचे ...

Cluttering under suspicion, undisclosed closure | मिटमिटावासी दहशतीखाली, अघोषित बंद

मिटमिटावासी दहशतीखाली, अघोषित बंद

googlenewsNext
ठळक मुद्देअख्खी रात्र काढली जागून : मुलं, महिला घाबरलेल्या; पोलिसांनी घरात घुसून नासधूस केल्यांचा महिलांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचरा टाकण्याच्या वादावरून बुधवारी उसळलेली दंगल, दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीमारामुळे पसरलेली भीती व दहशतीचे सावट मिटमिट्यातील महिला, मुलांच्या मनात गुरुवारी घर करून होते. चिमुकले आपल्या आयांना बिलगून होते. बाबा कुठे गेले, कधी येणार, असा प्रश्नही ते विचारत होते. तोडफोड झालेल्या दुचाकी गल्लोगल्ली तशाच पडलेल्या होत्या. काहींच्या टायलेटचे दरवाजे, घरातील कपाटाच्या काचा, टीव्ही फोडले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले व काही पोलीस भीतीने पसार झाल्याने बुधवारी रात्री गावात एकही पुरुष नव्हता. त्यामुळे महिला व मुलांनी अख्खी रात्र जागून काढली. गावात स्मशान शांतता पसरली होती. एकूणच मिटमिट्याचे दुसºया दिवशीचे चित्र विदारकच होते.
पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी मिटमिटा व पडेगाववासीयांनी कडकडीत बंद पाळल्याने या रोडवरील एकही दुकान उघडे नव्हते. मिटमिटा गावात तर गुरुवारी दिवसभर शुकशुकाट होता. गावात गल्लोगल्ली सर्वत्र दुचाकी पडलेल्या होत्या. त्यांचे हेडलाईट, पेट्रोल टाक्या, साईड इंडीकेटर आदी फोडलेले होते. गावात बोटावर मोजण्याइतकीच पुरुष मंडळी दिसत होती.
पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा महिला संताप व्यक्त करीत होत्या. निर्मला परसने यांनी सांगितले की, घरात घुसून पोलिसांनी आम्हाला मारले. गावातील बहुतांश सर्व माणसांना अटक केली. आज महिलांनाही अटक करणार, अशी चर्चा सुरू झाल्याने दहशत पसरली आहे.
घराबाहेर येण्यासही महिला, मुली घाबरत आहेत. पोलिसांनी घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा फोेडल्या, असे छाया मालोदे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आमच्या घरात घुसून तोडफोड करणाºयांना पोलीस म्हणावे काय? या दहशतीने लहान मुले घाबरली आहेत. अनेक जण आज शाळेतही गेले नाही. सुजाता नरवडे यांनी सांगितले की, माझ्या पतीला बेदम मारत नेले, आमच्या बाथरूमचे दरवाजे तोडण्यात आले.
कलाबाई नरवडे या ज्येष्ठ महिलेने सांगितले की, कालची घटना आठवली की, अजूनही अंगाचा थरकाप होतो. शकुंतला करपे म्हणाल्या की, अख्खी रात्र आम्ही जागून काढली. पूजा तिळवे ही महिला जेव्हा अपबिती सांगत होती तेव्हा तिची ४ वर्षांची मुलगी आई... डॅडी कुठे, घरी कधी येतील, असा प्रश्न विचारत होती. एकूणच संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते.
शाळेऐवजी कचरा टाकण्याचा घाट
पूजा तिळवे यांनी सांगितले की, मिटमिटा गावात मुख्य हायवेच्या पलीकडे शाळा आहे. रस्ता ओलांडताना दरवर्षी एका तरी मुलाचा अपघाती मृत्यू येथे होतो.
यासाठी शाळेची जागा बदला, अशी आमची अनेक वर्षांपासून मागणी आहे. त्याऐवजी पालिकेने आमच्या गावात अख्ख्या शहराचा कचरा टाकण्याचा घाट घातला .

Web Title: Cluttering under suspicion, undisclosed closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.