“चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय”: CM उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:36 PM2021-09-17T13:36:06+5:302021-09-17T13:36:30+5:30
मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते एकाच मंचावर होते. यावेळी मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या. विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तरही दिले. तसेच यावेळी मंचावर अनेक गमती-जमती, टोलेबाजी पाहायला मिळाली. यातच चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे माझ्या कानावर आले आहे, असे मिश्लिक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (cm uddhav thackeray taunts bjp chandrakant patil on his statement about former minister)
Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिले.
ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?
चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार
चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, असे म्हटले होते. माझ्या कानावर असे आलेय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असे म्हणताना मुख्यमंत्रीही हसले. उपस्थित पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला. याआधी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही डिवचले. माझ्या कानावर असे आलेय की, चंद्रकांतदादा नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. दादांच्या वक्तव्यानंतर मी त्यांना फोन सांगितले की, पुढचे २५ ते ३० वर्ष तुम्ही आणखी ‘माजी’च राहणार आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क?
दरम्यान, पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असे संबोधले. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत दिले होते. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या.