सीएनएक्स एलएमएस- करिअरला आकार देण्याची हीच योग्य वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:04 AM2021-05-01T04:04:16+5:302021-05-01T04:04:16+5:30
E4E मॅथ्स अकॅडमी हे नाव आज औरंगाबादकरांच्या परिचयाचे झाले आहे. ११ वी व १२ वीच्या बोर्ड अभ्यासक्रमातील गणित विषयासोबतच ...
E4E मॅथ्स अकॅडमी हे नाव आज औरंगाबादकरांच्या परिचयाचे झाले आहे. ११ वी व १२ वीच्या बोर्ड अभ्यासक्रमातील गणित विषयासोबतच जेईई, नीट, एमएचटी सीईटी यांच्यासह इंजिनिअरिंगच्या सर्वच प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या गणित विषयाची तयारी या अकॅडमीतून करून घेण्यात येते.
अवघड वाटणारा गणित हा विषय सोप्या पद्धतीने उलगडून सांगणे आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करून मुलांना विषयाचे आकलन करून देणे, हे शैलेश सरांच्या E4E मॅथ्स अकॅडमीचे वैशिष्ट्य आहे. आजवर E4E मॅथ्स अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेत तर चमकदार कामगिरी केलीच आहे, पण जेईई, नीट आणि इतर प्रवेश परीक्षांमध्येही E4E क्लासेसचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
चौकट :
नीट विचार करा..
- यावर्षी १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शैलेश सरांनी एक बहुमुल्य सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, मित्र- मैत्रिणी घेत आहेत, म्हणून एखाद्या कोर्सला प्रवेश घेणे टाळा.
- अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये आजच्या घडीला खूप तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्हाला आवड असेल आणि पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची तयारी असेल, तरच या वाटेवर जा.
चौकट :
E4E अकॅडमीची वैशिष्ट्ये-
- मर्यादित विद्यार्थी संख्या
- प्रत्येेक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
- नियमित प्रॅक्टीस टेस्ट
- अधिकाधिक सराव करण्यावर भर
- हसत-खेळत अभ्यास
- विद्यार्थी आणि शिक्षकांचा मनमोकळा संवाद
- घोकंपट्टीपेक्षा संकल्पना स्पष्ट करण्याला प्राधान्य
- व्यायाम व आरोग्यासाठी टिप्स
- डाएट आणि आहारविषयक मार्गदर्शन
- अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास
- सोप्या भाषेत सांगितल्या जाणाऱ्या ट्रिक्स
- पाया पक्का असेल तरच बुलंद इमारत उभी राहते. यानुसार सुरुवातीपासूनच गणिताचा पाया भक्कम करण्याकडे अधिकाधिक लक्ष.
चौकट :
मेडिकल की इंजिनिअरिंग कनफ्युजन ?
१ मे पासून सुरू होतेय फाऊंडेशन बॅच-
१० वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा, हे बहुुतांश विद्यार्थ्यांनी ठरविलेले असते, पण इंजिनिअरिंग करायचे की मेडिकलला जायचे, हे अनेकदा बऱ्याच मुलांचे ठरत नाही. त्यामुळेच जर विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग याबाबत संभ्रम असेल, तर तो संभ्रम दूर करण्यासाठी E4E क्लासेसतर्फे एक उत्तम पर्याय देण्यात आला आहे. १ मे पासून E4E क्लासेसमध्ये फाऊंडेशन कोर्स सुरू झाला आहे. महिनाभर असणारा हा कोर्स तुम्हाला कोणत्या शाखेचा अभ्यास झेपतो आहे आणि आवडतो आहे, याची पूर्ण कल्पना देणारा ठरेल. त्यामुळे हा काेर्स करून विद्यार्थ्यांना पुढच्या अभ्यासाची तर कल्पना येईलच पण त्यासोबतच त्यांचे बेसिकही पक्के होईल आणि करिअरची योग्य दिशाही ठरविता येईल.
चौकट :
E4E क्लासेसचे वेगळेपण
- वेळ झाली की, शिकविले आणि वेळ संपला की थांबले असे E4E क्लासेसच्या बाबतीत कधीच होत नाही. याविषयी सांगताना शैलेश सर म्हणाले की, १२ वीचे विद्यार्थी हे अनेकदा विविध गोष्टींबाबत भांबावलेले असतात. दोन पिढ्यांमधील फरकामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा त्यांच्या अडचणी पालकांना सांगणे कठीण होते आणि याचा नकळत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ लागतो. म्हणूनच, विद्यार्थ्यांशी मैत्रिपूर्ण नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून ते अभ्यासासोबतच इतरही अडचणींवर मनमोकळा संवाद साधू शकतील.
- कमी गुण मिळविलेेल्या विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे. गरज पडल्यास पालकांशी संवाद साधणे, फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कायम संपर्कात राहणे, विद्यार्थ्यांना काय येते, यापेक्षा काय येत नाही, याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करून त्यांचा कमकुवत पाया अधिक भक्कम करत जाणे, ही देखील E4E क्लासेसची वैशिष्ट्ये आहेत.