को- गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन... तज्ज्ञ म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:01+5:302021-01-18T04:02:01+5:30
को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये टेक्निकल आणि तज्ज्ञ लोकांचा समावेश पाहिजे. राजकीय लोकांचा त्यात समावेश नसावा. राजकारणाशी संबंध नसलेले तज्ज्ञ लोक खरा ...
को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये टेक्निकल आणि तज्ज्ञ लोकांचा समावेश पाहिजे. राजकीय लोकांचा त्यात समावेश नसावा. राजकारणाशी संबंध नसलेले तज्ज्ञ लोक खरा सल्ला देतील. शहराच्या विकासासाठी त्यातून हातभार लागेल. तज्ज्ञ जो सल्ला देतील, ते मान्य केले पाहिजे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने शहराचा विकास होईल.
-डॉ. सचिन फडणीस, नियोजित अध्यक्ष, ‘आयएमए’
सूचना लालफितीत अडकू नये
को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचा शहराच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल. शहरातील तज्ज्ञ लोक विकासाच्या दृष्टीने सूचना देऊ शकतील. विकासकामांवर देखरेख शहरातील तज्ज्ञच ठेवू शकतील. त्यामुळे दर्जात कामे होतील; परंतु स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचना अनेकदा लालफितीत अडकतात. तसे होता कामा नये. को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचा आराखडा कसा राहील, हेही पाहावे लागेल.
-डॉ. सतीश रोपळेकर, हृदयरोगतज्ज्ञ, वाहतूक विशेषज्ञ