मुख्याधिकाºयांचा कर्मचाºयांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:01 AM2017-09-20T01:01:09+5:302017-09-20T01:01:09+5:30
कार्यालयात तब्बल २० कर्मचारी गैरहजर आढळून आले. आले. यामुळे मुख्याधिकाºयांनी या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांची कळमनूरी येथे झालेल्या बदलीस मॅटने स्थगिती दिली. यामुळे सोमवारी (दि.१८) नगर परिषद कार्यालयात ते हजर झाले. यावेळी कार्यालयात तब्बल २० कर्मचारी गैरहजर आढळून आले. आले. यामुळे मुख्याधिकाºयांनी या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
पैठण न.प.मधील भाजपाचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सुर्यवंशी यांच्यात कामकाजा बाबत एकमत होत नसल्याने सुर्यवंशी दिर्घ रजेवर निघून गेले होते. दरम्यानच्या कालावधीत नगराध्यक्ष लोळगे यांनी मुंबईत सुत्रे हलवून मुख्याधिकारी यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून काढले होते.
विशेष म्हणजे नवीन मुख्याधिकारी म्हणुन कळमनूरी येथील मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यानंतर मुख्याधिकारी सूर्यवंशी यांनी या बदलीस मैट मध्ये आव्हान देऊन बदलीला स्थगिती मिळविली.
बदलीस स्थगिती मिळताच मुख्याधिकारी सूर्यवंशी यांनी सोमवारी नगर परिषद कार्यालय गाठले. त्यावेळी चक्क कार्यालयातील २० कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर कर्मचाºयांनी त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. २४ तासाच्या आत खुलासे करण्यास सांगण्यात आले आहे.
कार्यालयात गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये उपमुख्याधिकारी दिलीप साळवे, नि.आ. शेख, एच. के. वाघ, ऋ.बा. भालेराव, एम. जी पाटील, बी. के. मिसाळ, सी. आर. दूधे, व्ही.बी. शिर्के, इ .बी चौधरी, आर. पी. कुलकर्णी, व्यं. रा. पापुलवार, रा. तू.परळकर, यु. सु. मोरवे, किशोर लांडगे, सुभाष तुसामकर, विजय पैठणे, दिलीप भांगे, मुकुंद महाजन, उदय पटेल, शिवाजी पोटे यांचा समावेश आहे.