लेण्यांची सुरक्षा धोक्यात

By Admin | Published: November 14, 2015 12:44 AM2015-11-14T00:44:04+5:302015-11-14T00:54:03+5:30

मुजीब देवणीकर , औरंगाबाद जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेण्या पाहण्यासाठी भारतीयच नव्हे, तर विदेशी पर्यटकही हजारोंच्या संख्येने येतात. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या

Coke safety hazard | लेण्यांची सुरक्षा धोक्यात

लेण्यांची सुरक्षा धोक्यात

googlenewsNext


मुजीब देवणीकर , औरंगाबाद
जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेण्या पाहण्यासाठी भारतीयच नव्हे, तर विदेशी पर्यटकही हजारोंच्या संख्येने येतात. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मागील काही वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी लेण्यांच्या पायथ्याशी सिलिंडरचा स्फोट झाला होता, तर आता येथे येणारे पर्यटक रोज लेण्यांमधील मूर्र्तींसोबत छेडछाड करीत असल्याचे समोर आले आहे.
भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमध्ये आहेत. लेण्यांचे कोरीव काम पर्यटकांना मोहिनी घालणारे आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश- विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. लेण्यांच्या सुरक्षेचे दायित्व केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी येथील कॅन्टीनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सुदैवाने या स्फोटामुळे लेण्यांना कोणतेही नुकसान पोहोचले नव्हते.
दरम्यान, ‘लोकमत’ने वेरूळ लेण्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता विदारक चित्र समोर आले. येथे येणारे पर्यटक फोटो सेशनच्या नावाने चक्क मूर्र्तींसोबत छेडछाड करीत असल्याचे निदर्शनास आले. अनेक पर्यटक सेल्फी घेण्याच्या नादात चक्क मूर्र्तींवर जाऊन बसत आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणी चढून फोटो काढण्यात पर्यटक मग्न असतात. पर्यटकांना अडविण्यासाठी लेण्यांमध्ये एकही सुरक्षारक्षक नेमलेला नाही. पर्यटक मनात येईल, तेथे चढून फोटो काढत असतात. त्यांच्या या कृतीमुळे जागतिक वारसा लाभलेल्या लेण्यांना हानी पोहोचेल याचे गांभीर्यही राहत नाही.
लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासोबत मोबाईल असतोच. अनेक पर्यटक लेण्यांमध्ये मनात येईल, तेथे बसून फोटो काढत आहेत. विदेशी पर्यटक मात्र, अजिबात अशा पद्धतीने फोटो काढत नाहीत. लेण्यांसमोर उभे राहून अत्यंत शिस्तीत ते फोटो काढतात. देशी पर्यटकच मोठ्या संख्येने लेण्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पुरातत्व विभागाचे अधीक्षक एस.एम. चव्हाण यांच्याशी वारंवार संपर्क साधला असते ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Coke safety hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.