थंडीचा कडाका वाढला; यंदा प्रथमच औरंगाबाद @ ९.५ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:45 PM2020-12-22T12:45:21+5:302020-12-22T12:48:42+5:30

हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढउतार होत असल्याचा अनुभव शहरवासियांना येत आहे.

The cold snap intensified; For the first time this year, Aurangabad @ 9.5 degrees | थंडीचा कडाका वाढला; यंदा प्रथमच औरंगाबाद @ ९.५ अंश

थंडीचा कडाका वाढला; यंदा प्रथमच औरंगाबाद @ ९.५ अंश

googlenewsNext
ठळक मुद्दे दिवसभर वातावणात जाणवतोय गारवा तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

औरंगाबाद : उत्तरकेडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांनी शहरातील किमान तापमानात सोमवारी एकाच दिवसात ३ अंशाने घट झाली आणि यंदाच्या हिवाळ्यातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे.

हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढउतार होत असल्याचा अनुभव शहरवासियांना येत आहे. शहरात गेल्या ५ दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत गेला आणि थंडीत वाढ होत गेली. गार वाऱ्यामुळे दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दुपारी उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक दिसत होते. थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे अवघड होत आहे. थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. आगामी दिवसांत हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही खाली किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे.

हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, आगामी दिवसांत ''रेकॉर्ड ब्रेक'' थंडी वाढणार आहे. मराठवाडा हा यंदा ढगफुटींचा प्रदेश बनला आहे. परिणामी, जमिनीत पाण्याचे प्रमाण तसेच हवेतील आर्द्रता वाढलेली आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. यामुळे महाराष्ट्रात हाडे गोठवणारी थंडी निश्चितपणे जाणवणार आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया, ह्रदयरोगी, मधुमेही, अस्थमा आदी रुग्णांनी थंडीपासून बचावासाठी अत्यावश्यक काळजी व वेळेवर सुयोग्य औषधोपचार तसेच आहार-विहार घेणे आवश्यक आहे.
असा घसरला तापमानाचा पारा

तारीख - किमान तापमान (अंश सेल्सिअस)
१५ डिसेंबर - १६.६
१६ डिसेंबर - १६.२
१७ डिसेंबर - १६.४
१८ डिसेंबर - १५.९
१९ डिसेंबर - १५.०
२० डिसेंबर - १२.४
२१ डिसेंबर - ९.४

आगामी दिवसांतील किमान तापमानाचा अंदाज
तारीख-             किमान तापमान (अंश सेल्सिअस)
२२ डिसेंबर - १०.०
२३ डिसेंबर- ११.०
२४ डिसेंबर - १२.०
२५ डिसेंबर- १२.०
२६ डिसेंबर - १२.०
२७ डिसेंबर - १२.०

Web Title: The cold snap intensified; For the first time this year, Aurangabad @ 9.5 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.