वाळूज महानगरात थंडीचा कडाका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:02 AM2020-12-23T04:02:16+5:302020-12-23T04:02:16+5:30

-------------------------------- तौकीर शेख याचे यश वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयातील विद्यार्थी शेख तौकीर शेख सलीम याने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ...

The cold snap intensified in Waluj metropolis | वाळूज महानगरात थंडीचा कडाका वाढला

वाळूज महानगरात थंडीचा कडाका वाढला

googlenewsNext

--------------------------------

तौकीर शेख याचे यश

वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयातील विद्यार्थी शेख तौकीर शेख सलीम याने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शेख सलीम यांचे तौकीर चिरंजीव आहेत.

फोटो क्रमांक-तौकीर शेख

-----------------------

मसिआतर्फे जीएसटी आयुक्तांचा सत्कार

वाळूज महानगर : जीएसटी विभागाचे आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांची नुकतीच बदली झाल्याने मसिआ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला. उद्योगनगरीतील जीएसटीसंदर्भात औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी आयुक्त सिंग यांनी मदत केली होती. याप्रसंगी मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, किशोर राठी, नारायण पवार, भगवान राऊत, राजेंद्र चौधरी, राजेश मानधनी, मनिष अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

-------------------------------

दारू विक्रीप्रकरणी दोघे ताब्यात

वाळूज महानगर : रांजणगावात अवैधरीत्या दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. येथील दत्तनगर फाट्याजवळ अनंता तेजराव व्यवहारे (रा. घाणेगाव) हा १९ डिसेंबरला विनापरवाना देशी दारू विक्री करताना पोलिसांना सापडला, तर सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करून गोंधळ घालणाऱ्या शेख मोहम्मद (रा. रांजणगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

-------------------------

नगर रोडवर झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्याची कटाई करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून बजाज गेट ते कामगार चौकापर्यंत रस्त्यावर झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या फांद्यामुळे त्रास होतो. आता या झाडांच्या फांद्या तोडल्या जात असल्यामुळे वाहनधारकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

-----------------------------

सिडको वाळूज महानगरातील आंदोलन स्थगित

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कृती समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, सध्या ग्रामपंचायतीची निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने तसेच सिडकोच्या वतीने या परिसरातील देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. या आश्वासनानंतर कृती समितीने आंदोलन स्थगित केल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिली आहे.

-------------------------

गणेश वसाहत रस्त्यावर खड्डे

वाळूज महानगर : कमळापूर ते गणेश वसाहत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाळूज-कमळापूर या रस्त्याचे काम गत वर्षभरापासून रखडल्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताच्या घटनाही वाढल्या आहे. या रस्त्याचे रखडलेले काम सुरू करण्याची मागणी अमित शेजवळ, सुरेंद्र जाधव, मोहन शेळके यांनी केली आहे.

------------------

बजाजनगरात मोकळ्या भूखंडावर कचरा

वाळूज महानगर : बजाजनगरातील हॉटेल मृगनयनीच्या पाठीमागील रस्त्यावरील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. येथे लगतच एक महाविद्यालय असून या मोकळ्या भूखंडावर व्यावसायिक कचरा आणून टाकतात. या ठिकाणी पॉलिथिन पिशव्यांचा खच पडला असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नाक दाबूनच ये-जा करावी लागत आहे. या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

----------------------

Web Title: The cold snap intensified in Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.