शहरात थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:54 PM2018-12-17T23:54:42+5:302018-12-17T23:55:36+5:30
शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. गार वाºयामुळे दिवसाही गारठा अनुभवास येत आहे.
औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. गार वाºयामुळे दिवसाही गारठा अनुभवास येत आहे. चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी किमान तापमान ११.० अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली.
शहरात १२ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढला आहे. सलग चार दिवसांपासून बोचºया थंडीचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. थंडीमुळे सायंकाळनंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्याभोवती नागरिक बसलेले पाहायला मिळत आहे. थंडीमुळे दिवसा चहाच्या टपºयांवरही गर्दी होत असल्याचे दिसते.
१५ डिसेंबर रोजी कमाल तापमान २७.० अंश तर किमान तापमान १५.६ अंश इतके होते. १६ डिसेंबर रोजी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७.२ आणि १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. शहरातील किमान तापमानात सोमवारी घसरण होऊन ११.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. थंडीबरोबर दिवसा गार वारेही वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. परिणामी दिवसाही ऊबदार कपडे वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, पडसे यासारखे आजारही डोके वर काढत आहेत.
थंडीमध्ये व्यायामाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सकाळच्या बोचºया थंडीतही ऊबदार कपडे परिधान करून फिरायला जाणाºयांचीही संख्या वाढत असल्याचे दिसते. युवा वर्गाची पावले व्यायामशाळांकडे वळत आहेत.