शस्त्र जमा करण्याची लगबग सुरू, शहरात १,१४२, तर जिल्ह्यात ६०७ शस्त्र परवानाधारक

By सुमित डोळे | Published: April 4, 2024 07:51 PM2024-04-04T19:51:20+5:302024-04-04T19:51:25+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभाग फ्रंट मोडवर येऊन कामाला लागला आहे.

Collection of weapons started immediately, 1,142 in the city and 607 in the district | शस्त्र जमा करण्याची लगबग सुरू, शहरात १,१४२, तर जिल्ह्यात ६०७ शस्त्र परवानाधारक

शस्त्र जमा करण्याची लगबग सुरू, शहरात १,१४२, तर जिल्ह्यात ६०७ शस्त्र परवानाधारक

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील अधिकृत शस्त्र परवानाधारकांकडे पोलिस विभागाचे अधिक लक्ष जाते. निवडणूक आयोग व न्यायालयाकडून यंदा याबाबतचे धोरणे मवाळ झाले असले, तरी पोलिस विभागाने मात्र प्रत्येक शस्त्र परवानाधारकाची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. यात प्रामुख्याने काही परवानाधारकांचा मृत्यू झाल्याने त्यांचे शस्त्र तत्काळ पोलिस मुख्यालयात जम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. तशा सूचनाच विशेष शाखेकडून सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभाग फ्रंट मोडवर येऊन कामाला लागला आहे. शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी, एमपीडीए व प्रतिबंधात्मक कारवाया, हिस्ट्रीशीटर प्रामुख्याने लक्ष ठेवणे सुरू झाले आहे. त्याशिवाय निवडणुकीत प्रामुख्याने परवानाधारक शस्त्र जप्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरात सध्या १,१४२, तर जिल्ह्यात ६०७ शस्त्र परवानाधारक आहेत. यात ७० टक्के परवानाधारक हे उद्योग, व्यापार, राजकीय क्षेत्रातील असून जीवितास धोका, वैयक्तिक सुरक्षेच्या कारणातून घेतले आहेत. विशेष म्हणजे, या परवान्यांमध्ये घट होत गेल्या ४ वर्षांमध्ये १५९ परवाने रद्द झाले.

शहर व जिल्ह्यातील परवाने
शहर
एकूण परवाने पुरुष महिला
१,१४२  १,११७             २५
(१० पुरुष ) (१२ खेळाडू)

४ वर्षांपूर्वी घट
वर्ष परवाने

२०१४ ११०८
२०१९ १३०१
२०२३ १,१४२

ग्रामीण भागातही संख्या अधिक
१२ बोर शस्त्र परवानाधारक - ४१६
रिव्हॉल्व्हर / पिस्तूल परवानाधारक - १९१
एकूण - ६०७
- यामध्ये ४ खेळाडू, १५ बँक व्यवस्थापक, २ सहकारी साखर कारखाने, १ पेट्रोलपंप व ११३ माजी सैनिकांचा समावेश आहे.

निवडणुकीत जमा करावे लागते शस्त्र
शस्त्राचा निवडणुकीदरम्यान गैरवापर होऊ नये, या हेतूने निवडणुकीच्या काळात शस्त्र जमा करणे बंधनकारक होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने सरसकट शस्त्र गोळा न करण्याचा निकाल दिला होता. यंदा निवडणूक आयोगाने देखील याबाबतचे आदेश मवाळ केल्याने यंदा मोठा बदल झाला. पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती कोणाचे शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे, कोणाला सूट द्यायची याविषयी निर्णय घेते. यासाठी समिती कारणे पाहून निर्णय देते.

कोणाकडे केवळ परवाना, कोणाचा मृत्यू
शहरात ११४२ परवानाधारक असले, तरी यातील अनेकांनी शस्त्र खरेदी केले नसल्याचे पाहणीतून समोर आले आहे. तर अनेक परवानाधारकांचा मृत्यू झाला आहे; परंतु त्यांचे शस्त्र अद्याप पोलिसांकडे जमा झालेले नाही. अशा निधन झालेल्या परवानाधारकांचा परवाना व शस्त्र मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. बँक, सुरक्षारक्षक, खेळाडूंना या नियमातून सूट असते.

Web Title: Collection of weapons started immediately, 1,142 in the city and 607 in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.