विद्यापीठात सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात, सर्व विभागांनी घेतला सहभाग
By योगेश पायघन | Published: August 17, 2022 11:38 AM2022-08-17T11:38:11+5:302022-08-17T11:38:42+5:30
प्र-कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ वाल्मिक सरवदे आदींच्या उपस्थित झाला सोहळा
औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात आज सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायले गेले.
प्र-कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ वाल्मिक सरवदे आदींच्या उपस्थित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सवा अंतर्गत विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत महात्मा फुले सभागृह राष्ट्रगीत गायन झाले. तसेच विद्यापीठातील प्रत्येक विभागात राष्ट्रगीत सामूहिकरित्या म्हटले गेले. यात विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित संख्याशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायले गेले. यावेळी डॉ. सुनील कावळे, डॉ. तायडे, डॉ. ओमप्रकाश जाधव आदींचा सहभाग होता.