जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:46 AM2017-10-20T00:46:28+5:302017-10-20T00:46:28+5:30
गृहविभाग प्रधान सचिवांनी याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे राज्यातील एस.टी. परिवहन सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा येण्या-जाण्याच्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गृहविभाग प्रधान सचिवांनी याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
गृह विभागाच्या पत्रानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारीचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा, बसेस, खासगी वाहतूक बसेस, महानगरपालिकेच्या वाहतूक योग्य बसेस, सदर बसेसचे वाहक, चालक यांना विभागीय व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ यांनी दिलेल्या मार्गावर तसेच एस.टी.च्या भाडेदराने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी राहील. राज्य परिवहनाचे आगार / बसस्थानक परिसर वापरण्याची परवानगी त्यांना राहील. प्रवासी वाहतूक करताना खासगी बसेस, शाळा, कॉन्व्हेंट शाळा बसेस, सर्व खासगी बसेस या एस.टी. महामंडळ दरापेक्षा जादा भाडे आकारात नाहीत. याबाबत दक्षता घेण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळ कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने जिल्ह्यातील रेल्वेस्थानक व बस प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेता अनुचित घटना घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने सुरक्षा व बंदोबस्त ठेवावा.