कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:51+5:302021-04-02T04:04:51+5:30
लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या मिलिंद चौकात आहे. रात्रीचा कर्फ्यू असतानाही विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर ...
लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या मिलिंद चौकात आहे. रात्रीचा कर्फ्यू असतानाही विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर आमची कारवाई सुरू आहे.
कोरोना अजून संपलेला नाही. उलट तो वाढतोय. औरंगाबाद शहरात तर एका मिनिटाला एक याप्रमाणे रोज पंधराशे रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाशी भांडण असू शकते. परंतु, सर्वांना मिळून कोरोनाशी मुकाबला करावयाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे याबाबतीत कोणाची हार-जीत वगैरे असे मानण्याची गरज नाही व त्यावरून मिरवणुका व जल्लोष करण्याचीही गरज नाही.
एप्रिल महिन्यात महापुरुषांची जयंती व सणवार येत आहेत, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसारच सणवार व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या कराव्या लागतील. गर्दी टाळावीच लागेल. मिरवणुका रद्द कराव्याच लागतील.
घाटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी विविध स्वयंसेवी संस्था व कंपन्यांकडून मिळणाऱ्या साधनसामग्रीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकार करण्यात आला. घाटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याकामी निश्चित पुढाकार घेईल, असे ते म्हणाले.