महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या सूचना
By | Published: December 5, 2020 04:06 AM2020-12-05T04:06:39+5:302020-12-05T04:06:39+5:30
औरंगाबाद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर निमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शक सूचना ...
औरंगाबाद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर निमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे. महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा करावा. सदरील कार्यक्रमांना गर्दी करू नये. चैत्यभूमी, दादर येथील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांवरून करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी दादर येथे न जाता घरातूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
आश्रमशाळा , निवासी शाळा, वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता
औरंगाबाद: जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळा व नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता आदिवासी विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे. सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महापालिका रुग्णालयात, मनपाने निश्चित केलेल्या केंद्रात कोरोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे.