आकर्षक रंगरंगोटीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:37 PM2018-11-24T23:37:44+5:302018-11-24T23:38:17+5:30
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रुपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई सुरू आहे.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रुपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई सुरू आहे.
‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर विविध कामांचा धडाका सध्या रेल्वेस्टेशनवर सुरू आहे. यात प्रामुख्याने रेल्वेस्टेशनच्या मुख्य इमारतीच्या रंगकामाला प्राधान्य देण्यात आले. गेली अनेक वर्षे ही इमारत केवळ पांढºया रंगाची होती. परंतु आता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना नजरेसमोर ठेवून पांढºया रंगाच्या भव्य इमारतीला आकर्षक असे रंगकाम करणे सुरू आहे. यात इमारतीवरील नक्षीकामाचा भाग चॉकलेटी रंगाने रंगविण्यात आला. त्यामुळे रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. औरंगाबादेत दाखल होणारे अनेक पर्यटक इमारतीसमोर छायाचित्र घेत असल्याचे पाहायला मिळते.
कारंजे होणार सुरू
रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोरील कारंजे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. परंतु हे कारंजेही पुन्हा सुरू केले जाणार आहे. नव्या इमारतीच्या अंतर्गत भागात रंगकाम आणि दुरवस्था झालेल्या भागांची दुरुस्ती केली जात आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्तानेच कामे करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
जुनी इमारत ‘जैसे थे’
मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यात जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुसºया टप्प्यातील काम काही केल्या सुरू झालेले नाही. त्यामुळे जुन्या इमारतीची अवस्था वाईट झालेली आहे.