वैजापूर तालुक्यातील सिंचन प्रकल्प ‘कोमात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:22 AM2018-02-10T00:22:48+5:302018-02-10T00:23:02+5:30
जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
यामुळे आगामी ३ ते ४ महिने तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. आता प्रशासन ऐनवेळेवर भविष्यातील पाणीटंचाईवर काय उपाय करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तालुक्यात मार्चच्या पंधरवड्यानंतरच उन्हाळ्याची चाहूल लागते. पुढे एप्रिल, मे अणि जून महिन्यांत ही धग कायम राहते. यंदा मात्र, ‘मे हिट’ तडाखा फेब्रुवारीतच नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्री गारवा तर दिवसा सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.
तालुक्यातील दहा सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच तालुक्यात दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे.
मात्र, असे असले तरी पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा अद्याप सज्ज झालेला नाही. नवीन विंधन विहिरी व कूपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पूर्वी पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावांत करायच्या असतात. मात्र, या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय पं.स. स्तरावर झालेला नाही.
त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी, लागणार हे जवळपास निश्चित आहे.
नारंगी प्रकल्पात
२ टक्केच पाणी
वैजापूर शहराला नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या प्रकल्पात केवळ २ टक्के पाणी आहे.
च्या प्रकल्पातून शहरासह बाजूच्या ७ ते ८ गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाते.
च्त्यामुळे या प्रकल्पातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होऊन वैजापूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढऊ शकते.
ढेकू तलावही तळाला
च्ढेकू तलावाला शेतकºयांचे संरक्षित सिंचन म्हटले जाते. या तलावामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी टिकून राहते. मात्र, यावर्षी या तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे.
च्यामुळे गावखेड्यांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरींची पातळीही घटली आहे.
सिंचन प्रकल्पांची आजची स्थिती
प्रकल्पाचे नाव
कोल्ही मध्यम प्रकल्प
नारंगी मध्यम प्रकल्प
बोरदहेगाव मध्यम प्रकल्प
खंडाळा लघु प्रकल्प
बिलवणी लघु प्रकल्प
सटाणा लघु प्रकल्प
गाढे पिंपळगाव लघु प्रकल्प
जरुळ लघु प्रकल्प
मन्याड साठवण तलाव
वांजरगाव बंधारा
एकूण सरासरी
क्षमता (दलघमी)
३.२४
११.५०
११.४७
०.४७२
०.७६९
१.१७
१.६२९
१.१६
३.०१
२.१५
३६.५९
आजचा साठा
०.६८२
जोता खाली
जोता खाली
०.०१७
जोता खाली
जोता खाली
०.२२४
कोरडे
२.५२
०.२२५
३.६६८
टक्केवारी
२१.०४
२.००
---
३.५६
--
--
१३.७४
---
८४.००
१०.७१
१०.०३