दिलासा ! शहराची कोरोना मृत्यूवर मात; ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:58 AM2021-07-01T11:58:19+5:302021-07-01T11:59:26+5:30
corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सध्या ६५० रुग्णांवर सुरू उपचार
औरंगाबाद : शहराने बुधवारी आठवडाभरात दुसऱ्यांदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागातील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाच्या ९० नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १९, तर ग्रामीण भागातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. ( corona virus in Aurangabad )
जिल्ह्यात सध्या ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात चार महिन्यांनंतर २५ जून रोजी शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. आता आठवड्याभरात दुसऱ्यांदा बुधवारी शहरात एकही कोरोनाबळी गेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार २०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २५ आणि ग्रामीण भागातील ८५ अशा ११० रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना अडगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १, किर्ती हाऊसिंग सोसायटी, एन-८ येथे १, जयभवानीनगर १, टीव्ही सेंटर १, पैठण गेट १, सिडको १, पडेगाव १, पानचक्की १, अन्य ११.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद तालुक्यात २० फुलंब्री तालुक्यात एक, गंगापूर तालुक्यात १५, कन्नड तालुक्यात ३, वैजापूर तालुक्यात २३, पैठण तालुक्यात ९ रुग्णांची वाढ झाली.