दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:50 PM2021-08-11T13:50:25+5:302021-08-11T14:05:29+5:30

Autram Ghat Tunnel and Road Work : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

Comfortable! Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat | दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींना शिष्टमंडळ भेटलेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार म्हणून काम रद्द करण्यात आले, या अफवा चुकीच्या आहेत

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ( NH Dhule -Solapur )औट्रम घाटात बोगदा ( Autram Ghat Tunnel ) व रस्त्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली. तेव्हा या कामाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला दिला. (  Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat) 

दरम्यान, संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने कळविले की, औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून त्याबाबत सकारात्मक हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल. यापूर्वी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय दळणवळण विभागाचे सचिव तथा राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी अध्यक्ष गिरिधर अरमाने यांच्याशीही याबाबत सविस्तर चर्चा केली.

खैरे यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिले की, या बोगद्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले, अशा चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे परिसरात गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, या कामाच्या खर्चामध्ये थोडीफार कपात करून हे काम पूर्ण केल्यास मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरेल. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ बाबत लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित केला असून, बोगद्याचा विकास आराखडाही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम सध्या ८० टक्के पूर्ण झाले आहे. बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा कायम होत राहील.

राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्गावरील (क्रमांक ३९) लासूर स्टेशनचा रस्ता ओलांडताना अपघातांची संख्या वाढली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांसाठी ही समस्या असून, याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी, कन्नड बायपास, अंधानेर येथेही सर्विस रोडची गरज असून ती तत्काळ मान्य करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दाबके, माजी उपनगर अध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: Comfortable! Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.