दिलासादायक ! औरंगाबादहून एप्रिलमध्ये धावणार नव्या रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 07:29 PM2021-03-31T19:29:13+5:302021-03-31T19:30:03+5:30
नव्या गाड्यांमुळे रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबादहून एप्रिलमध्ये नव्या रेल्वे धावणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.
नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रामार्गे निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. निजामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस ७ एप्रिलपासून निजामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री १०.४० सुटेल. आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबादमार्गे नांदेड येथे पोहोचेल. नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस २ एप्रिलपासून दर शुक्रवारी नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि परभणीमार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी ४.५० वाजता पोहोचेल.
औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून दर सोमवारी नांदेड येथून रात्री १.०५ वाजता सुटेल आणि परभणीमार्गे नांदेड येथे सकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) २ एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री ८.५० वाजता सुटेल. रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) ३ एप्रिलपासून रेनीगुंटा येथून रात्री ९.२५ वाजता सुटेल.