दिलासादायक ! रविवार कोरोनाने एकही मृत्यू नसलेला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 02:39 PM2020-12-28T14:39:38+5:302020-12-28T14:41:32+5:30

coronavirus news औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू

Comfortable! Sunday is a day of no death by Corona | दिलासादायक ! रविवार कोरोनाने एकही मृत्यू नसलेला दिवस

दिलासादायक ! रविवार कोरोनाने एकही मृत्यू नसलेला दिवस

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी ६४ रुग्णांची वाढ७१ जण कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्युचक्राला ब्रेक लागला. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ६४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६४ रुग्णांत मनपा हद्दीतील ५१, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५५ आणि ग्रामीण भागातील १६ अशा एकूण ७१ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण : भगतसिंगनगर ४, काल्डा कॉर्नर ५, कौशलनगर ५, एन चार, स्पंदननगर १, टाऊन सेंटर १, एन तीन, सिडको १, एन बारा, सिद्धार्थनगर १, एन नऊ, एम दोन, हडको १, उस्मानपुरा १, मिलिनियम पार्क १, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, जाधववाडी १, कासलीवालपूरम १, सातारा पोलीस स्टेशनजवळ १, इटखेडा १, आरेफ कॉलनी १, दिशा संस्कृती सो. १, कैलासनगर १, नवनाथनगर, हडको १, अल्तमश कॉलनी १, समतानगर १, मुकुंदनगर १, धूत हॉस्पिटल परिसर १, गादिया विहार १, समर्थनगर २, रामनगर २, एन पाच, श्रीनगर १, एन सात, सिडको १, एन अकरा, सिडको १, एन बारा, भारतमातानगर १, सूतगिरणी चौक परिसर १, गारखेडा १, एन दोन, सिडको १, वसंत अपार्टमेंट सिडको १, अन्य ३

ग्रामीण भागातील रुग्ण : किन्नी, सोयगाव १, खुलताबाद १, नारायणपूर, गंगापूर १, घालखेडी १, अन्य ९.
 

Web Title: Comfortable! Sunday is a day of no death by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.