कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:28 AM2018-04-11T01:28:04+5:302018-04-11T11:10:06+5:30

१४ जखमी : निधोना येथील दुर्घटना; गावावर शोककळा, मृत मजूर परभणी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे गाव प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर ठार, तर १४ जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

 Command building collapses slab Two laborers killed | कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

googlenewsNext

बाबरा : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे गाव प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर ठार, तर १४ जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

निधोना येथे लोकवर्गणीतून गावाबाहेर प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम तीन महिन्यांपासून सुरू आहे. साईडच्या २५ फूट उंचीच्या दोन्ही खांबांचे काम पूर्ण करून मंगळवारी सायंकाळी आडवा स्लॅब टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्लॅबवर सहा मजूर काम करीत होते, तर उर्वरित दहा मजूर खाली काम करीत होते. स्लॅबचे काम करीत असताना अचानक दोन बल्ल्या तुटल्या व स्लॅब खाली कोसळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्लॅबवरील सहापैकी दोन मजूर ठार झाले, तर उर्वरित चार जण व खाली असलेले दहा जण जखमी झाले.

मयतांची नावे
सोनू आळणे (२१), बालाजी रामभाऊ भिसे (२७, सर्व रा. झोलम पिंप्री, ता. गंगाखेड जि. परभणी).

जखमींची नावे
भागवत रामभाऊ भिसे (३०, रा. परभणी), तिरुपती सुरेश लवटे (२४), गणेश संजय आरके (२२), सुनील संजय राठोड (२१, तिघे रा. आनंदवाडी, ता. पालम, जि. परभणी), गोरख सांडू मोकासे, विशाल सपकाळ, सुरेश धनवई, सागर आहेर, राजू मोकासे, संदीप दवंगे, मनोज धनवई, रामचंद्र ओपलकर, गणेश मोकासे, सुनील मोकासे, दत्तू दवंगे (सर्व रा. पिशोर, ता. कन्नड).

या घटनेची माहिती कळताच मदतीसाठी गावकरी धावले. ग्रामस्थांनी सर्व जखमींना सिमेंट, रेतीच्या ढिगाऱ्याखालून काढले व तात्काळ घाटी रुग्णालयात पाठविले; परंतु तोपर्यंत दोघांनी प्राण सोडला. या दुर्घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून गावावर शोककळा पसरली आहे. प्रवेशद्वाराची रुंदी ४० फूट ठेवण्यात आली होती. निधोना येथील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सदरील काम करण्यात येत होते. पाणी फाऊंडेशनच्या खोलीकरणामुळे हे गाव एकजुटीने विकासकामे करण्यात मग्न झाले आहे; परंतु या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश पाटील हे रुग्णवाहिका व कर्मचाºयांना घेऊन तात्काळ मदतीसाठी धावले. वडोदबाजार पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title:  Command building collapses slab Two laborers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.