घाटनांद्र्यांत सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:17+5:302021-03-25T04:05:17+5:30
घाटनांद्रा : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आमठाणा प्राथमिक ...
घाटनांद्रा : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घाटनांद्रा गावात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, सुपरवायझर तसेच शिक्षकांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. ३१ मार्चपर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार असून, गावकरी याला प्रतिसाद देत आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांसारखी लक्षणे असलेल्या संशयितांची कोरोना तपासणी करणे, वयोवृद्धांची माहिती गोळा करणे, दमा, मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देणे ही सर्व कामे सर्वेक्षणातून केली जात आहेत. तसेच ६० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकणे, पर्यवेक्षक वाल्मीक घुगे, सहशिक्षक रूपेश चौरे, विजय पानतावणे, सुधाकर मोठे, रऊफ शहा, रोशन खवसे, आनंद जांभूळकर, माधवराव मोरे, संदीप पिवळ, अंगणवाडी सेविका प्रमिला सोनार, संजीवनी मोरे, मीना जोशी, संगीता जोहरे, सरस्वती कापसे, आशा स्वयंसेविका सुरेखा पिंपळे, रत्ना लिगाडे हे काम करीत आहेत.
फोटो : घाटनांद्रा गावात नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करताना आशा स्वयंसेविका.