करंजखेड घाट रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:05 AM2021-01-18T04:05:11+5:302021-01-18T04:05:11+5:30
करंजखेड खाडी (घाट) रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तब्बल पंधरा वर्षांपासून येथील लोकांना खडतर रस्त्याचा सामना करावा लागत आहे. करंजखेड ...
करंजखेड खाडी (घाट) रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तब्बल पंधरा वर्षांपासून येथील लोकांना खडतर रस्त्याचा सामना करावा लागत आहे. करंजखेड व चिंचोली परिसरातील पन्नास ते साठ गावांंमधील नागरिकांना करंजखेड घाटातून प्रवास करीत पिशोर, कन्नड, औरंगाबादकडे जावे लागते. हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता मानला जातो. येथे कायम रहदारी असते. मात्र, पंधरा वर्षांपासून रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यासंदर्भातील लोकांनी अनेकवेळा बांधकाम खात्याकडे माहिती दिली. रस्त्याचे व घाटाचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली.
अखेर बांधकाम विभागाकडून यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असून रविवारी घाटातील रस्त्यावर ठेकेदारांकडून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात लवकरच मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहेे. अभियंत्ता सोनकांबळे यांनी सांगितले की, घाटाचा रस्ता असल्यामुळे तो दर्जेदार बनविण्याकडे लक्ष राहील. साफसफाई, योग्य पद्धतीचे मटेरिअल त्यात टाकून कामकाज केले जाणार आहे.
फोटो
करंजखेड येथे खाडी (घाट)च्या रस्त्याच्या सिमेंटचे काम रविवार सुटीचा दिवस पाहून सुरू करताना.