कृषी विद्यापीठाच्या तूर वाण विक्रीचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 AM2021-06-01T04:05:11+5:302021-06-01T04:05:11+5:30
कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विद्यापीठ निर्मित संशोधित बियाणे पेरणीसाठी उपलब्ध ...
कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विद्यापीठ निर्मित संशोधित बियाणे पेरणीसाठी उपलब्ध व्हावी म्हणून परभणीबाहेर बियाणे विक्री उपक्रम सुरू केला. त्यामुळे शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांची जवळीकता वाढली. लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ झाला. शेतकरी स्वतः बियाणे उत्पादक झाला पाहिजे. यासाठी ज्या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज लागेल ते आमच्या कृषी शास्रज्ञांमार्फत आवश्य दिली जाईल. आपण कौशल्य जपत उत्तम सुधारित वाणाचे बियाणे घरच्या घरी तयार करून परिसरातील गरज भागविण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले.
डाॅ. दिनकर जाधव म्हणाले, वारंवार कापूस लागवड केल्याने या पिकाबद्दल काही समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबाद विभागात तूर क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केला जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले, तर आभार केव्हीकेचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी केले. शेतकऱ्यांनी रांगेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून बियाण्याची मान्यवरांच्या उपस्थित खरेदी केली.