श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:11+5:302021-01-17T04:05:11+5:30
उद्घाटनप्रसंगी नाथवंशज श्रीकृष्ण गोसावी, किशोर चौहान, नगरसेवक भूषण कावसनकर, चंद्रशेखर गोसावी, हरी पंडित गोसावी, विलास मोरे, दत्ता ...
उद्घाटनप्रसंगी नाथवंशज श्रीकृष्ण गोसावी, किशोर चौहान, नगरसेवक भूषण कावसनकर, चंद्रशेखर गोसावी, हरी पंडित गोसावी, विलास मोरे, दत्ता गुरु पोहेकर,
माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, संजय पापडीवाल, प्रा. संतोष तांबे, जयवंत पाटील, सतीश आहेर, गणेश पवार, मुकुंद ठोसर, प्रभाकर चव्हाण यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी नाथवंशज श्रेयस गोसावी यांचे गायन झाले. त्यांनी राग जय जयवंती (बडा ख्याल विरुद्ध छोटा ख्याल) दिल की तपीश है आफताब राग किरवानी व विसावा विठ्ठल सुखाची माउली या अभंगाचे गायन करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर आदिती गोसावी यांच्या सदाबहार शास्त्रीय गायनात रसिक श्रोते तल्लीन झाले. अविनाश थीगळे यांनी संगीत महोत्सवाचे सूरत्रसंचालन केले.
यांचे होणार गायन
दोन दिवसीय संगीत महोत्सवात श्रेयस गोसावी, आदिती गोसावी, गिरीश जोशी, श्रीकृष्ण (मिलिंद) गोसावी, नागेश आडगावकर यांचे बहारदार गायन होणार आहे. योगीराज पांडे, सुधीर काळे, सौरभ क्षीरसागर, अभिनय खंदे, मिलिंद गोसावी यांची गायकांना संगीत साथ लाभेल. महोत्सवासाठी नांदेड, परभणी, अंबाजोगाई, जालना येथील शास्त्रीय संगीताचे रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवात कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन केले जात आहे, असे मिलिंद बुआ गोसावी यांनी सांगितले.