वाणिज्य : स्वर्गरथ स्मशानभूमीतच ठेवण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:16+5:302021-04-23T04:05:16+5:30
शहरातील हिवरखेडा रोडवर हिंदू-वडार-दशनाम गोसावी समाज यांच्यासाठी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून स्व. केशवराव पवार यांच्या ...
शहरातील हिवरखेडा रोडवर हिंदू-वडार-दशनाम गोसावी समाज यांच्यासाठी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून स्व. केशवराव पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ उद्योजक मनोज पवार यांनी विनामूल्य स्वर्गरथ अर्पण केला आहे. तथापि नगर परिषदेची सत्ताधारी मंडळी या सामाजिक उपक्रमात अडथळा निर्माण करीत असून, हा रथ स्मशानभूमीमधून हटविण्यासाठी दम देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्मशानभूमीत स्वर्गरथ उभा असल्यास मृत व्यक्तींसाठी तो तत्काळ उपलब्ध होईल, या हेतूने तो स्मशानभूमीत उभा ठेवला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत स्वर्गरथ उभा करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर उद्योजक मनोज पवार, मनोज देशमुख, संजय कवडे, योगेश त्रिभुवन, संदेश पवार, सुरेश जंगले, केतन त्रिभुवन, बंटी जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : स्मशानभूमीत उभा असलेला स्वर्गरथ.
220421\aher madhukar aher_img-20210417-wa0062_1.jpg
स्मशानभूमीत उभा असलेला स्वर्गरथ.