वाणिज्य : कायगाव, अंमळनेर ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:04 AM2021-02-24T04:04:17+5:302021-02-24T04:04:17+5:30
अंमळनेर सरपंचपदी मुक्ता कर्जुले अंमळनेरच्या सरपंचपदी मुक्ता लवकुश कर्जुले तर उपसरपंचपदी मनीषा किरण साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
अंमळनेर सरपंचपदी मुक्ता कर्जुले
अंमळनेरच्या सरपंचपदी मुक्ता लवकुश कर्जुले तर उपसरपंचपदी मनीषा किरण साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी मुक्ता लवकुश कर्जुले तर उपसरपंच पदासाठी मनीषा किरण साळवे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य मुक्ताबाई कर्जुले, मनीषा किरण साळवे, अलिशान अफजल पठाण, रामेश्वर मिसाळ, अमजद पठाण, अविनाश साळवे यांनी सहभाग घेतला. यावेळी पं. स. सदस्य सुमित मुंदडा, बाबासाहेब भरपुरे, सचिन मुंदडा, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव मिसाळ, माजी सरपंच जिलानी पठाण, माजी उपसरपंच खंडेराव गवारे, सुरेश मिसाळ, आप्पासाहेब मिसाळ आदींची उपस्थिती होती.
फोटो : कायगावच्या सरपंचपदी हरिश्चंद्र काशीनाथ माळी तर उपसरपंचपदी अंजुम मोसीन शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
230221\fb_img_1612843409481_1.jpg
कायगाव ग्रामपंचायत