वाणिज्य : समंतभद्र विद्यामंदिरात भित्तिपत्रक चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:42+5:302021-02-26T04:04:42+5:30
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण संस्थेचे सचिव डॉ. प्रेमचंद पाटणी, माजी सरपंच प्रकाश पा. मिसाळ, उपतालुकाप्रमुख सुनील औटे यांच्या ...
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण संस्थेचे सचिव डॉ. प्रेमचंद पाटणी, माजी सरपंच प्रकाश पा. मिसाळ, उपतालुकाप्रमुख सुनील औटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत एकूण ८१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक विभागातून शिवम सुरडकर, पलक जैन, शेख मुस्कान, भाग्यश्री काळे, ओम कायस्थ, उत्कर्ष चौधरी; तर माध्यमिक विभागातून पवन जाधव, वेदान्त मुठे, तेजस्विनी बोडखे, ऋतुजा आहेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षिसे प्राप्त केली. यावेळी राजकुमार पांडे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, सचिन अन्नदाते, सुकुमार नवले, नितीन वाडेकर, संजय महाजन, आशिष कान्हेड, संतोष जैन, अंकुश ठोळे, महेंद्र वाकळे, आदींंची उपस्थिती होती.
स्पर्धेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष हर्षवर्धन जैन, सुनील औटे, दीपक जैन व पारस जैन यांनी योगदान दिले.
फोटो कॅप्शन : वेरूळ येथील गुरुदेव संमतभद्र विद्यामंदिर शाळेतील भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड. व्यासपीठावर डॉ. प्रेमचंद पाटणी, प्रकाश पाटील, गुलाबचंद बोराळकर उपस्थित होते.
250221\sunil gangadhar ghodke_img-20210225-wa0025_1.jpg
वेरुळ येथील गुरूदेव संमतभद्र विद्या मंदीर शाळेतील भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करतांना शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड, व्यासपीठावर डॉ. प्रेमचंद पाटणी, प्रकाश पाटील, गुलाबचंद बोराळकर.