वाणिज्य वार्ता - छत्रपती शाहू कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:25 AM2020-12-17T04:25:03+5:302020-12-17T04:25:03+5:30
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांना भेटी, कार्यशाळा, व्याख्याने यामुळे महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी शिवांजली जाधव महाराष्ट्रातून अंतिम वर्षाच्या परीक्षेत ...
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांना भेटी, कार्यशाळा, व्याख्याने यामुळे महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी शिवांजली जाधव महाराष्ट्रातून अंतिम वर्षाच्या परीक्षेत तृतीय असून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज विविध देशांत कार्यरत आहेत. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उच्चशिक्षित प्राध्यापकवृंद, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, अद्ययावत सुविधा, स्वच्छ व सुंदर परिसर, प्रभावी व्यवस्थापन या सर्व बाबींचा परिणाम म्हणून महाविद्यालयास सतत उत्कृष्ट दर्जा देऊन गौरविले जाते, असे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. उल्हास शिंदे व प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी या यशानिमित्त सर्व विभागप्रमुखांचे कौतुक केले.
फोटो ओळ :
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट दर्जा देऊन करण्यात आलेला गौरव.