वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:17+5:302021-02-07T04:05:17+5:30
सिल्लोड : कृषी निविष्ट विक्रेत्यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात, असे आव्हान कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी ...
सिल्लोड : कृषी निविष्ट विक्रेत्यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात, असे आव्हान कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने दुकानदारांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आकाश ऑग्री सोल्युशन्सचे संचालक आकाशचंद्र गौर यांचे हस्ते झाले. कृषी विभागाच्या स्मार्ट योजना राबविण्यासाठी विक्रेत्यांची महत्त्वाची भूमिका असते. असे पाटील यांनी प्रशिक्षणात सांगितले. कंट्रोल ऑफिसर संजय व्यास यांनी लॉकडाऊन काळात डिलर्स लोकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सेवेबाबात गौरव केला. आकाश ऑग्री येथे गेल्या वर्षी देखील प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. जनरल इनपुट डिलर्स, फर्टिलायझर डिलर्स व पेस्टिसाइड डिलर्सच्या सदस्यांना ‘दाईसी’ आणि ‘सर्टिफाइड कोर्स फॉर इनसेक्सीसाइड डिलर्स’ हे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय आगामी काळात परवाने नूतनीकरण होणार नाही. यावेळी आकाश एजन्सीचे संचालक अनिल गौर, आशीष गौर, संजय मोटे, दत्तात्रय भवर, प्रशिक्षण संचालक राजीव पाटील, कार्यक्रम संचालक राहुल राजपूत, प्रशिक्षक वासीम पटेल, किशोर मिरगे, सुनील शिरसाट, अश्विनी सुरडकर यांची उपस्थिती होती.
फोटो :