उद्योगासाठी घेतलेल्या भूखंडाचा व्यवसायिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 08:32 PM2019-03-27T20:32:51+5:302019-03-27T20:33:02+5:30

वाळूज उद्योगनगरीत कंपनी सुरु करण्यासाठी अल्पदरात एमआयडीसीकडून खेरदी केलेल्या भुखंडाचा सर्रासपणे व्यवसायिक वापर केला जात आहे.

 Commercial use of the plot taken for the industry | उद्योगासाठी घेतलेल्या भूखंडाचा व्यवसायिक वापर

उद्योगासाठी घेतलेल्या भूखंडाचा व्यवसायिक वापर

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत कंपनी सुरु करण्यासाठी अल्पदरात एमआयडीसीकडून खेरदी केलेल्या भुखंडाचा सर्रासपणे व्यवसायिक वापर केला जात आहे. या भुखंडावर पोटभाडेकरुसाठी दुकाने थाटून विविध व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. याकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करित असल्यामुळे नव उद्योजकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


वाळूज उद्योग नगरीत एमआयडीसीने कंपनी सुरु झाल्यानंतर अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल या भावनेतून उद्योग सुरु करण्यासाठी नाममात्र दरात भूखंड दिले आहेत. उद्योगनरीतील अनेक कारखाने बंद पडले असून, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी औद्योगिक भूखंडाचा पोटभाडेकरु साठी वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपुरातील उद्योग भारती कॉम्लेक्समध्ये एमआयडीसीने कारवाई करुन काही दुकाने सील केली होती. पण कामगार चौकासह परिसरात बिंदास्तपणे सुरु असलेल्या व्यवसायिक वापर भूखंडधारकावर एमआयडीसी प्रशासनाकडून सोयीस्कररित्या डोळेझाक केली जात आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संकर्प साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.


नव उद्योजकाला भूखंड मिळेना..
वाळूज उद्योनगरीत आज घडील अनेक नव उद्योजक स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी करीत आहेत. परंतू त्यांना भूखंड मिळत नाही. उद्योग बंद पडलेले व व्यवसायिक वापर होत असलेले भूखंड एमआयडीने ताब्यात घेवून होतकरु नव उद्योजकांना द्यावेत. अशी मागणी राकेश सिंह, नरेंद्र यादव, सुरेश पहाडे, वेदप्रकाश चौधरी, राजेश सिंह, संदीप दुबे आदींनी केली आहे.

Web Title:  Commercial use of the plot taken for the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.