बीडीओ सुरवसे यांच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:54 AM2017-09-14T00:54:04+5:302017-09-14T00:54:04+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या थेट वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊनही पूर्णा येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी नांदेड येथील एका खाजगी दुकानदाराला यासाठी पैसे वर्ग केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे़

Committee for inquiry into BDO Survase | बीडीओ सुरवसे यांच्या चौकशीसाठी समिती

बीडीओ सुरवसे यांच्या चौकशीसाठी समिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या थेट वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊनही पूर्णा येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी नांदेड येथील एका खाजगी दुकानदाराला यासाठी पैसे वर्ग केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे़
स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा अनुदानाचा निधी त्यांच्या थेट बँक खात्यावर जमा न करता तो खाजगी दुकानदाराकडे देण्यात आला़ व खाजगी दुकानदाराने लाभार्थ्यांना थेट साहित्य दिल्याने गोंधळ झाल्याची घटना गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय बनली होती़ जि़प़चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यावर या प्रकरणात अनेक आरोप झाले़ त्यानंतर त्यांची बदलीही झाली़ आता असाच प्रकार पुर्णेत झाल्याची चर्चा आहे़ जि़प़च्या सर्वसाधारण सभेने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता़ महिनाभरापूर्वी पूर्णा पंचायत समितीला जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, सदस्य अजय चौधरी यांच्यासह अन्य अधिकाºयांनी भेट देवून कागदपत्रांची तपासणी केली होती़ त्यानंतरही गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी २७ लाख ६० हजार रुपयांचा निधी नांदेड येथील एका दुकानदाराला दिला असल्याच्या तक्रारी जि़प़ सदस्यांकडे करण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली़ त्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़ व्ही़ करडखेलकर व जि़प़ सदस्य अजय चौधरी या दोन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला़ ही समिती महिनाभरात आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे़ त्यामुळे याबाबत बीडीओ सुरवसे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याची जि़प़ वर्तुळातून चर्चा होताना दिसून येत आहे़

Web Title: Committee for inquiry into BDO Survase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.