शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:20 AM2017-08-19T00:20:53+5:302017-08-19T00:20:53+5:30

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ शिक्षकांचे समायोजन, अनियमितता व सततच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत समितीच्या सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला़

Committee for inquiry into education officer Sontakke | शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या चौकशीसाठी समिती

शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या चौकशीसाठी समिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ शिक्षकांचे समायोजन, अनियमितता व सततच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत समितीच्या सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला़
मागील अनेक दिवसांपासून स्थायी समिती, सर्वसाधारण सभा व समितीच्या बैठकीस शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के हे गैरहजर राहत आहेत़ शिक्षणाधिकारी कार्यालयातही उपस्थित राहत नसल्याने शिक्षणाधिकारी राहतात तरी कुठे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात झालेला गैरव्यवहार काही दिवसांपासून चर्चेत होता़ गतवर्षी अनुदानित प्राथमिक शाळेत २९६ अतिरिक्त शिक्षक ठरले होते़ त्यातील केवळ ५ जणांचे समायोजन झाले़ सेवानिवृत्तीमुळे १५४ शिक्षकांचे त्याच शाळेत रिक्त पदावर समायोजन झाले़
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्नही पुढे आला होता़ अतिरिक्त शिक्षकांना कामावर हजर न करणाºया खाजगी शाळेच्या संस्थाचालकांवर शिक्षणाधिकारी कोणतीच कारवाई करण्यात तयार नव्हते़ न्यायालयीन आदेशाचे पालनही होत नव्हते़ ६६ नियमबाह्य नवीन शिक्षक भरती प्रकरणातही कोणी लक्ष देण्यास तयार नाही़ २ मे २०१२ नंतर भरती झालेल्या काही शिक्षकांना शिक्षणाधिकाºयांनी सेवासातत्य दिले आहे़ अशा विविध विषयासोबत शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची सातत्याने चर्चा सुरू होती़
दरम्यान, आज शिक्षण समितीच्या बैठकीत हे सर्वच विषय समोर आले़ शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत सर्व सदस्यांनी शिक्षणाधिकारी सोनटक्के यांची चौकशी करण्याची मागणी केली़ तेव्हा चौकशी समिती स्थापन करण्याच्या ठरावाला सभेने मंजुरी दिली़ यावेळी सदस्य साहेबराव धनगे, व्यंकटराव गोजेगावकर, बबनराव बारसे, अनुराधा पाटील, संध्याताई धोंडगे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Committee for inquiry into education officer Sontakke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.