सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

By विकास राऊत | Published: May 21, 2023 01:43 PM2023-05-21T13:43:41+5:302023-05-21T13:44:55+5:30

शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार

Common citizens will get cheap sand; The first depot in Marathwada started in Vaijapur | सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी अपेक्षा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली.

मराठड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे. या उपक्रमात परिवहन विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या विभागाने वाळू वाहतूकीचे दर कमी केल्यास सामान्य माणसाला आणखी फायदा होईल. शासनाने स्वस्तात वाळू उपलब्ध करून दिल्याने घराच्या किंमती देखील कमी होतील असेही ते म्हणाले.

Web Title: Common citizens will get cheap sand; The first depot in Marathwada started in Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.