शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या; नमिता मुंदडांनी केली अन्नत्याग आंदोलनात मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 07:38 PM2021-10-04T19:38:32+5:302021-10-04T19:41:59+5:30

MLA Namita Mundada News : अतिवृष्टीमुळे केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीची जमीन खरडून गेल्याने सोयाबीन, ऊस व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Compensate farmers at Rs 50,000 per hectare; MLA Namita Mundada made a demand in the hunger strike movement | शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या; नमिता मुंदडांनी केली अन्नत्याग आंदोलनात मागणी 

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या; नमिता मुंदडांनी केली अन्नत्याग आंदोलनात मागणी 

googlenewsNext
ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणीआंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

अंबाजोगाई : ढगफुटीसह झालेल्या अतिवृष्टीने केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. तरीदेखील शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप कसलीही मदत दिली नाही. त्यामुळे सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा तातडीने द्यावा आणि शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी (दि.०४) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आ. मुंदडा यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. 

अतिवृष्टीमुळे केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीची जमीन खरडून गेल्याने सोयाबीन, ऊस व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेकडो पाळीव जनावरे, हजारो कुकुट पक्षी अतिवृष्टीमुळे मृत पावलीत. जमीन, पिक तर गेलेच परंतु त्यासोबतच शेतातील पाईपलाईन, मोटारी, ठिबक, तुषारचे संच, इतर मशिनरी हे सर्वच वाहून गेल्याने  शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरांसह रस्ते, पूल, बंधारे, विद्युत खांब यांचेही प्रचंड नुकसान झाले. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही आणि शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालेला असूनही अद्याप राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यासाठी कुठलीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर २०२० व २०२१ चा पीक विमा देण्यात यावा. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात केज मतदार संघातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

पालकमंत्र्यांच्या मागणीची करून दिली आठवण
काही वर्षापूर्वी विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी विधानभवनासमोर आंदोलन करून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी तत्कालीन भाजप सरकारकडे केली होती. त्या आंदोलनची आठवण करून देत आ. मुंदडा यांनी आताही तीच मागणी ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सरकारकडून मान्य करून घ्यावी असे आवाहन केले. 

भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही आंदोलनात सहभागी होत समर्थन दिले. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रामभाऊ कुलकर्णी, ऋषीकेश आडसकर, भगवानराव केदार, अच्युत गंगणे, विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, विष्णू घुले, तपसे काका, सुदाम पाटील, डॉ. नेहरकर, मुरली बप्पा ढाकणे, मधुकर काचगुंडे, डॉ. अतुल देशपांडे, हनुमंत तौर, शेख ताहेर भाई, बाला पाथरकर, अनंत लोमटे, सुरेश कराड, खलील मौलाना, डॉ. पाचेगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Compensate farmers at Rs 50,000 per hectare; MLA Namita Mundada made a demand in the hunger strike movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.