बबिता फोगट, कंगनाच्या बहिणीविरोधात तक्रार; मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:48 PM2020-04-17T22:48:35+5:302020-04-17T22:49:13+5:30
बबिता फोगट हिने भारतात कोरोना पसरण्यासाठी तबलीगी जमात जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट व कंगणा राणावतच्या बहिणीविरूद्ध मुस्लिम समाजाविषयी तेढ निर्माण होईल, अशी सोशल मिडियावर पोस्ट केल्या बद्दल तक्रार. सिटीचौक पोलिसांनी फोगटविरुद्धची तक्रार हरियाणा पोलिसांकडे, तर कंगणा राणावतच्या बहिणीविरुद्धची तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग केली आहे.
बबिता फोगट हिने भारतात कोरोना पसरण्यासाठी तबलीगी जमात जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. यांनादेखील बबिताने सडेतोड उत्तर दिलेले पाहायला मिळालं. जमातने कोरोनाचा संसर्ग केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता आणि भारताने कोरोनाला हरवलं असतं. ज्यांना सत्य ऐकण्यास त्रास होतो त्यांना मला सांगायचं आहे, मी सत्य बोलत राहणार आणि लिहीत राहणार. तुम्हाल सत्य ऐकायला आवडत नसेल तर तुम्ही आपली सवय बदला अथवा सवय लावून घ्या, असे खडेबोल बबिता फोगटने टीकाकारांना सुनावले होतं.
तर कंगना रनावत हिच्या बहिणीनेही अशाप्रकारे टीका केली होती. त्यामुळे ट्विटरनेही तिचं अकाऊंट सस्पेंन्ड केल आहे.